१.
मी इथे,तू तिथे नांदले पाहिजे
सौख्य माझे तुला लाभले पाहिजे
रोज मी बोलतो आतले सांगतो
दुःख हलके अता वाटले पाहिजे
रात सारी उभी जागली कैकदा
आसवांची फुले जाहली पाहिजे
सांग वेडे मला आतल्या वेदना
भाव सारे मनी गाडले पाहिजे
गाव माझे जरा घे बघूनी गडे
पाय वाटा जुन्या चालले पाहिजे
२.
किती आवडीने तुला पाहतो मी
उगा जीव माझा किती जाळतो मी
जगावे कसे मी मलाही कळेना
कसा गुंतलेला पुन्हा टाळतो मी
तुझ्या पावलांनी मला जाग यावी
सकाळी सकाळी तुला वाचतो मी
तुझ्या गावची ती खुशाली कळू दे
जगाला कळू दे तुला मागतो मी
तुझ्या पैंजणांची पहाटे भुपाळी
अशा धुंद वेळी किती भाळतो मी
कसा आवडू मी तुला लागलो गं
तुला वाळवंटी झरा वाटतो मी
तुझे नाव आहे अता काळजावर
सुखाने जगाया मला सांगतो मी
.................................
संजय घाडगे
बोडकेकर, लातूर
9822911985
9834571536
अप्रतिम
ReplyDelete