१.
मागचे विसरून जगता येत नाही
अंतरीचे दुःख बघता येत नाही
भोवताली मित्र सारे आज असुनी
कोण सच्चा तो ठरवता येत नाही
वेदना माझी जरी अनमोल आहे
वाटते तीही शमवता येत नाही
चेहऱ्यावर हास्य उसने आणते मी
पण व्यथा हृदयी लपवता येत नाहीः
काळजाला तू दुखवले फार आहे
प्रेम माझेही विसरता येत नाही.
२.
आधाराचे प्रतीक असते बाई म्हणजे
सौभाग्याचे प्रतीक असते बाई म्हणजे
रीत मुलांना बालपणी ती लावत असते
संस्काराचे प्रतीक असते बाई म्हणजे
आल्या गेल्या सर्वांचे ती सदैव करते
कर्तव्याचे प्रतीक असते बाई म्हणजे
मायेने ती घरातल्यांची कामे करते
वात्सल्याचे प्रतीक असते बाई म्हणजे
गरीब गरजू लोकांसाठी सदा धावते
कैवल्याचे प्रतीक असते बाई म्हणजे
.................................
शोभा वागळे
मुंबई.
8850466717
Very nice 👍👍🙂🙂
ReplyDeleteखूप छान , अभिनंदन!!
ReplyDeleteछान
ReplyDeleteNice
ReplyDeletesunder
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteसुंदर
ReplyDeleteवा... खूपच सुंदर ,👍👍👌👌
ReplyDeleteअभिनंदन
ReplyDeleteसुंदर
ReplyDelete