१.
घेतला विमा शरीराचा
नाहीच मिळत नशीबाचा
येतो जातो हवे तेंव्हा
काय भरवसा पावसाचा
भान हरपले, मन गुंतले
ध्यास लागता सावळ्याचा
कर्तृत्वाने जिंकून मन
झाला शिवबा समाजाचा
शक्तीपेक्षा श्रेष्ठ युक्ती
नियम सांगतो लढायाचा
२.
झाले माझे वय आज जरी सत्तर
मुलांकरीता सदैव बनते कणखर
सबला नारी होण्यासाठी पोरी
घे तू आता पाठीवरती दप्तर
येता अडचण फार वाटते अवघड
कधीकधी तर वेळच असते उत्तर
जिव्हाळ्याने सुंदर फुलते जीवन
नात्यात कधी नकोस ठेवू अंतर
मुलगा-मुलगी भेद कोणता नसतो
गिरवू अक्षर, समाज घडवू साक्षर
.................................
सौ. प्रतीक्षा किरण नांदेडकर
सिंगापुर
No comments:
Post a Comment