गझल : विनोद कुळकर्णी

 
येऊन कोण गेले, सजल्या दिशा फुलांनी 
स्पर्शून पैजंणाना, झाली हवा दिवाणी 

जेव्हा बुडून गेली, नयनात सांज माझ्या 
फुलली  असेल तेव्हा, परसात रातराणी 

गुलजार बासरीच्या, श्वासात तूच होती 
कंठात दाटलेली, होती तुझीच गाणी 

ज्यांना कधी न कळले, ते प्रेम पाखरांचे 
त्यांना नवीन होती,माझी तुझी कहाणी 

माझ्याच सावलीला, जाळून सूर्य गेला 
गगनात तारकांची, ऐकून घे जबानी 

......................
विनोद कुळकर्णी


No comments:

Post a Comment