दोन गझला : अलका देशमुख

१.

मनाला बांधतो आता
स्वतःशी भांडतो आता

कुणाला बोल लावू मी 
सुखाने नांदतो आता

किती संताप आवरतो 
तरीही वाढतो आता

मनाचीकाहिली सगळी
स्वतःतच सांडतो आता

मनाच्या कुट विचारांना
मनातच  कांडतो आता

२.

सारखे जाचणे बरे नाही
आतले साचणे बरे नाही

बोल आता खरे जरासे तू
सारखे हासणे बरे नाही

शोभते का तुझ्या वयालाही?
हे उगा नाचणे बरे नाही...

त्या जुन्या रूळल्या रिवाजांनी
जीवना काचणे बरे नाही

बोल तू कोस तू जगाला या
ओठ ते टाचणे बरे नाही

आसवांनी भिजायचे आता
कोरडे डाचणे बरे नाही

No comments:

Post a Comment