१.
जन्म स्त्रीचा घेतला अन् कैक चटके झेलले मी.
मात करुनी संकटांवर जिंकले अन् हर्षले मी.
वेदनांचे घाव होते काळजाला झोंबणारे
पण बिचाऱ्या चेहऱ्यावर हास्य खोटे राखले मी.
ताल धरुनी नाचणारा हात होता मालकाचा
मन विवश त्या नाचणाऱ्या बाहुलीचे ताडले मी.
मल्ल कुस्ती खेळतांना पाठ टेकू देत नाही
जिंकण्याचा मंत्र शिकुनी खेळ माझा खेळले मी
मैत्र करुनी लेखणीशी उच्च शिखरे प्राप्त केली,
लाटणे अन् लेखणीचा मेळ घालत
चालले मी.
२.
अन्य कोणा बोलतांना तू स्वतःला पाहणे
सोड आता व्यर्थ तूही ह्या जगाला ऐकणे
पार कर कर्तव्य सगळे,झेल इथले भार तू
प्राक्तनाचे भोग सारे,का जनाला दोषणे?
धर्म आहे सत्य वदणे तूच पालन कर इथे
व्यर्थ आहे अन्य कोणी तव मनाला सांगणे.
यत्न काही तू न केले,स्वच्छ करण्या चेहरा,
का अता मग डाग दिसता दर्पणाला कोसणे?
पत्करूनच दु:ख सारे,सौख्य मानत राहणे
अन्य काहीआज नाही ईश्वराला मागणे
................................
सौ. सुषमा राम वडाळकर,
बडोदा
Wa waaaaah... khup sundar!!!
ReplyDeleteThank you...Mandar
ReplyDeleteअप्रतिम ताई
ReplyDelete