१.
अन्यायावर घाव शिवाजी
स्वातंत्र्याचे नाव शिवाजी
वीर निपजले लाखो जेथे
त्या मातीचा गाव शिवाजी
दिसता सावट अन्यायाचे
आत उसळतो ताव शिवाजी
छाती ज्याची पोलादाची
तोच मराठा साव शिवाजी
बिथरुन जाती लाखो फौजा
ऐसा गनिमी डाव शिवाजी.
अबलांचा हा रक्षणकर्ता
इतिहासाला ठाव शिवाजी
संकट जेव्हा येते अवचित
हाक उमटते धाव शिवाजी
आयुष्याचा स्फूर्तीदाता
जगण्यामधला भाव शिवाजी
२.
मला माणसा तू बरा पाहिजे रे
तुझा चेहरा हासरा पाहिजे रे
जिथे रोज घडते असे कृत्य खोटे
तिथे माणसा तू खरा पाहिजे रे
तिमीरात उजळे सदा ज्योत ज्याची
असा दीप साऱ्या घरा पाहिजे रे
मनाला तुझ्या या न आवर कदापी
तुझा नम्र बाणा जरा पाहिजे रे.
सुखाने जगावे मनाच्या किनारी
अशी घट्ट अविचल धरा पाहिजे रे
.................................
विशाल कन्हेरकर.
मो.9172298839.
No comments:
Post a Comment