गझल : अजित सपकाळ



जीवनाचा डाव मी खेळून गेलो
काळजावर घाव मी झेलून गेलो

न्याय माझा फायलीच्या आड लपला
तारखांचा घाट ओलांडून गेलो

बंद झाले आज डोळे कायद्याचे
शोषली का निर्भया समजून गेलो

काम नाही दाम नाही फार झाले
कामगाराची दशा पाहून गेलो 

लाक्षघर हे पेटलेले पाहताना
कौरवांना आज मी चिरडून गेलो

No comments:

Post a Comment