१.
केलास आज कैसा पाठीत घाव मित्रा
खेळून आज गेला प्रेमात डाव मित्रा
कप्तान तूच होता नौका कशी बुडाली
गेला बुडून माझा झोपेत गाव मित्रा
डोहात अंतराच्या जाऊन खोल माझ्या
जाणून भाव माझे केला लिलाव मित्रा
एकांत जीवनाचा तू दूर फार केला
घेऊ कसे तुझे मी शत्रूंत नाव मित्रा
मानून देवता मी पूजा तुझीच केली
पैशात मोजला रे तू भक्तिभाव मित्रा
मागून घ्यावयाचा होतास प्राण माझा
मैत्री पुढे कुठे रे देहास भाव मित्रा
तो तूच मारणारा कळताच ठार झालो
मैत्रीस जागणारा माझा स्वभाव मित्रा
कुठलेच शल्य नाही मरणास भेटताना
मैत्रीत प्राण गेला स्वर्गात नाव मित्रा
जाळात पेटताना भेटून जा जरासा
दावून जा जरासे खोटेच भाव मित्रा
२.
भास्कराने पोळलेल्या वावराला काय सांगू?
दु:ख काळ्या ढेकळांचे पावसाला काय सांगू?
वाळवंटाच्या फुलाचा राग येतो ना तुलाही
रक्त माझे आसवांचे मोगर्याला काय सांगू?
अग्निवर्षा होत आहे ,युद्ध आहे पेटलेले
काजव्यांचा आर्त टाहो भास्कराला काय सांगू?
दोन नोटाही मिळेना कामगारांच्या तपाला
मीठ नाही भाकरीला सागराला काय सांगू?
काळजाला खोदले मी लावताना स्वप्न माझे
आसवांचा पावसाळा कातळाला काय सांगू?
.................................
पंकजकुमार उत्तम ठोंबरे
कोंडोली तालुका मानोरा
जिल्हा वाशीम 9503717255
क्या बात है....... बहूत खूब.....
ReplyDeleteपंकजजी .... खूप छान रचना......
ReplyDeleteKhup chan pankaj bhau saheb
ReplyDelete