दोन गझला : ओमप्रकाश ढोरे


१.

मैत्री माझी अटळ ठेवतो
मी शत्रूला जवळ ठेवतो

डावपेच मज जमला नाही
जगणे साधे सरळ ठेवतो

अमृत बिमृत काहीच नसते
सर्प मुखातच गरळ ठेवतो

सोन्याहुनही खूप चमकते
शोभेसाठी पितळ ठेवतो

हारजीत ही चालत असते
दावे माझे प्रबळ ठेवतो

२.

धर्म अफूची गोळी आहे
ही जनता तर भोळी आहे

एक मताची किंमत सांगू
फुकट साडी चोळी आहे

नवल नको हे वाटायाला
केवळ सत्ता डोळी आहे

फक्त मलीदा खाण्यासाठी
ही जमलेली टोळी आहे

एक भिकारी गाणे गातो
आनंदाची झोळी आहे

दार घराचे बंद असोनी
अंगणात रांगोळी आहे
...............................

ओमप्रकाश ढोरे
स्वेदबिंदू
शिक्षक काॕलनी
चांदूर बाजार.जि.अमरावती
मो.क्र.९४२३४२७३९०

2 comments:

  1. प्रयत्नांच्या वेलीला यशाची फुले

    ReplyDelete