१.
हल्ली माझ्या ह्या कवितांना लाइक नाही, कमेंट नाही
समतावादी माणुसकीला लाइक नाही, कमेंट नाही
ज्यांना आम्ही मोठे केले त्यांनीच दिला धोका आता
इतरांसाठी जगणा-याला लाइक नाही, कमेंट नाही
शोषित,पीडित जनतेसाठी युध्द करतात अंधाराशी
प्रकाश उधळत विझणा-यांना लाइक नाही, कमेंट नाही
शेतक-याचे जीवन म्हणजे गोड विषाच्या नदीत बुडणे
दुनियेकरिता बुडणा-याला लाइक नाही, कमेंट नाही
देवांसाठी,धर्मांसाठी खून करतात माणुसकीचा
माणुसकीस्तव लढणा-यांना लाइक नाही, कमेंट नाही
२.
बाग फुलवू नवी जीवनाची अता
वाट पाहू पुन्हा माणसाची अता
भेटते हे मरण पावलोपावली
सोड तू पायरी मीपणाची अता
अंध केले तुला सावलीने तुझ्या
दिसत नाही कुरुपता मनाची अता
जिंकले शेवटी देव हे, धर्म हे
नष्ट झाली धरा माणसांची अता
थांबलो मी कुठे? हारलो मी कुठे?
सवय झाली मला झुंजण्याची अता.
देत आहे दगा 'तो' तुलाही जगा;
बुडवते लाट 'अच्छे दिना'ची अता.
स्पर्श झाला तुझा, माठ तो बाटला
कर तयारी कबर खोदण्याची अता
.................................
मिलिंद देविदास हिवराळे
सादिक नगर, मु.पो.ता. बार्शिटाकळी,
जि. अकोला - 444401 (म. रा.)
भ्र. 7507094882
ईमेल : milindhiwarale@yahoo.com
छान
ReplyDelete