गझल : हरिपंडित


साज शृंगार झाला बरा
एक आजार झाला बरा

मोकळे केस झाले तिचे
त्यात अंधार झाला बरा

ओठ, डोळे तिच्या त्या बटा
कोणता वार झाला बरा

हात हातात आला तिचा
हाच आधार झाला बरा

2 comments:

  1. अप्रतिम लेखन, शब्द रचना
    हरिपंडीत

    ReplyDelete