१.
कुणा सांगू,कसे सांगू,तुझी ती याद आली तर
समेवर दुःख विरहाचे अशातच दाद आली तर.
उभा हा जन्म डागाळे भ्रमाचे रक्त मुरताना
पुन्हा पाऊल का थांबे जराशी साद आली तर.
किती घंटी नकाराची,कसे ते तर्कही खोटे
कधी मग ठाम निश्चीती जरा अपवाद आली तर.
कशी भांगात मातीच्या दिसे ती आग वणव्याची
ढगांची नेमकी मस्तीच सालाबाद आली तर।
२.
दुःख माझ्या आवडीचे फार आहे
ही सुखाची लाघवी तकरार आहे
बाँब,कसला तोफखाना,युध्द कोठे
धर्म जाती हेच तर औजार आहे
जन्म आहे जाहला मग का पळावे
हेच जगणे स्वर्गमय संसार आहे!
हे मनातुन काढ आता मायबापा
फक्त मुलगा शेवटी आधार आहे
काळजाला लावतो डावावरी का
प्रेम इथला देखणा व्यापार आहे!
भूक कैसी,दंगलीचा म्होरक्या हो
चालते रे आपले सरकार आहे
.................................
रवींद्र जवादे,
शब्दश्री,भट्टड ले-आऊट,
समतानगर,मूर्तिजापूर.
जि.४४४१०७
मोबा-९४२०७०८०२६
पहिली गझल आवडली. त्यात विरहाचे, भुकेचे, आठवणींचे, निर्णय प्रक्रियेतील त्रासाचे, मातीचे शेतकऱ्याचे, नालायक पोर निघालेल्या बापाचे दुःख आहे.
ReplyDeleteदुसरी गझल हे जीवनातील दुःख आणि जीवन प्रवास समजून सांगणारी आहे.. स्त्री-पुरुष समता आणि इह वादाचा पुरस्कार करणारी आहे. धर्मानी राजकारणाची नोटंकी सांगणारी आहे. आपले अभिनंदन!!
खूपच छान गझला' आहेत
ReplyDeleteधर्म जाती हेच तर औजार आहे... मस्त
ReplyDelete